हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सणासुदीला शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार PM किसान योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत या योजने अंतर्गत 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता 15 ऑक्टोबरला 15 वा हप्ता येण्याची शक्यता आहे.
शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी आजच Hello KrushiHello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी ओपन करताच त्यातील कृषी योजना विभागावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व योजनाची माहिती मिळेल. त्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान योजनेवर क्लिक करून या योजनेसाठी तुम्ही थेट अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला 1 रुपयाचाही खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, पशु खरेदी विक्री, यांसारख्या असंख्य सुविधा मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.
अस चेक करा तुमचं नाव- PM Kisan Yojana
तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेत तुमचे नाव पहायचे असेल किंवा तुमच्या संपूर्ण गावातील लोकांची नावे पहायची असतील तर तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला दिसणार्या लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. आता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या गावातील सर्व लोकांची नावे दिसतील. किंवा तुम्ही १५५२६१ या नंबरवर कॉल करून तुमची स्थिती तपासू शकता.