नवी दिल्ली | संसदेत ग्रंथालयातील एका हॉलमध्ये आज भाजपच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी यांच्या सहित अमित शहा यांनी देखील संबोधले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी खासदारांची चांगलीच तोंडी परीक्षा घेतली. संसदेत मंत्री फेरवार ड्युटीला गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची मला नावे द्या. मला सगळ्यांनाच वटणीवर आणायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत ३०३ खासदार निवडून आल्याने नरेंद्र मोदी हुरळून गेले नाहीत. तर त्यांनी त्यांच्या खासदारांना चांगलेच कामाला लावण्याचे ठरवले आहे. आपल्या मतदारसंघात समाजसेवेची कामे करा. लोकांमध्ये जाऊन कामे करा. तसेच आपल्या मतदारसंघात नाविन्यपूर्ण कामे करण्यावर भर द्या असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. माझे सगळ्यांवर लक्ष आहे मला सगळ्यांना वटणीवर आणायचे आहे असे म्हणायला नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
फेरवार ड्युटीला संसदेत मंत्री उपस्थितीत राहत नाहीत. त्यामुळे मला विरोधी पक्षाचे खासदार पत्र पाठवून तक्रारी करतात. म्हणून अशा मंत्र्यांची मला नावे द्या मला सगळ्यांना वटणीवर आणायचे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मोठ्या प्रमाणावर शिस्तीचा अनुसार करण्याचे ठरवले आहे. पाच वर्षातील एक हि दिवस सत्तेत विश्रंती नघेता सर्वांनी लोकांचे काम करण्याचे धडे आज नरेंद्र मोदींनी आपल्या खासदारांना दिले आहेत.