Wednesday, March 29, 2023

केजरीवाल यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी अभिनंदन करतांना म्हणाले…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्तेची चावी सोपविली आहे. आम आदमी पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केजरीवाल याचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये अभिनंदन करताना मोदी यांनी लिहिलं आहे,”आप’ आणि अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन! दिल्लीकरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!”

- Advertisement -

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.