देशाने मला पंतप्रधान बनवलं असलं तरी मी तुमच्यासाठी कार्यकर्ता  – नरेंन्द्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | देशाने मला जरी पंतप्रधान बनवलं असलं तरी मी तुमच्यासाठी कार्यकर्ता आहे. आणि माझ्यासाठी तुमचा आदेश सर्वांत महत्वाचा आहे. असं मत पंतप्रधान नरेंन्द मोदी यांनी वाराणसी येथील सभेत व्यक्त केलंय.

पंतप्रधान मोदी सध्या वाराणसी मतदार संघाच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज सकाळीच काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतलं. यानंतर बहुमताने निवडून दिल्याबद्दल काशीवाशियांचे आभार मानण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

काशीवाशीयांवर माझा विश्वास होता अाणि त्यामुळेच मी निश्चिंत होतो. क्वचितच एखादा उमेदवार निवडणुकीवेळी इतका निश्चित असतो जितका मी होतो. मतदानाच्या वेळीही मी निश्चित होतो आणि निकालाच्यावेळीही मी निश्चित होतो. या निश्चिततेचं कारण मोदी न्हव्हते तर तुमच्या सर्वांचे परिश्रम होते असे उद्गार मोदी यांनी काढलेत.

Leave a Comment