हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज मृत्यु होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना मुळे फक्त सर्वसामान्य माणसेच नव्हे तर दिग्गज लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला.
मोदी म्हणाले, या कठीण कोरोना काळात आपल्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”
PM @narendramodi gets emotional, remembers those who lost their lives during #COVID19@PMOIndia pic.twitter.com/PVYolSG9oO
— DD News (@DDNewslive) May 21, 2021
वाराणसीच्या डॉक्टरांना मोदी म्हणाले, “आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. आता आपल्याला “जहाँ बीमार, वही उपचार” या मंत्राने काम करावं लागेल”
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.