नवी दिल्ली |नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत भरगोस विजय मिळाल्या नंतर उद्या सकाळी नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. या संर्दभात नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरून घोषणा केली आहे. तर परवा ते स्वतःच्या निर्वाचन मतदारसंघात म्हणजे वाराणसी मतदारसंघात जनतेचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत.
Will be going to Gujarat tomorrow evening, to seek blessings of my Mother. Day after tomorrow morning, I will be in Kashi to thank the people of this great land for reposing their faith in me.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2019
२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. तसेच वडोदरा मतदारसंघात जाहीर सभा देखील घेतली होती. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी दिल्लीला रवाना झाले होते. मात्र यावेळी नरेंद्र मोदी लोकसभा निकालाच्या दिवशी दिल्लीत होते. तेथेच त्यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्तांना संपादित केलेल्या विजया निमित्त संबोधित केले होते.
दरम्यान काल नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि लोकसभा विसर्जित करण्याचा ठराव पास करण्यात आला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोविंद यांनी देखील हा राजीनामा स्वीकारला आहे.