हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मृतांना आदरांजली वाहिली आहे. तसेच 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
याबाबत पीएमओ कडून अधिकृत ट्विट करण्यात आले की विरार दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
दरम्यान, वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.