हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो.
मुंबईत आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होतायत आणि प्रवासाला जास्तीचा वेळही जातोय. हि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. याच कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. सर्व उदघाटनानंतर मोदी गोरेगाव येथील नेसकसेन्यतर
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प:
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हा भारतामधील शहरी भागातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
हा बोगदा बांधताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवत काम केलं जाणार आहे.
प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती
या बोगद्यामधून सिग्नल रहित आणि विना थांबा प्रवास करता येणार आहे.
बोगद्याच्या उभारणीसाठी 16 हजार 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ठाणे-बोरिवलीदरम्यान प्रवासाचा वेळ 1 तासाने कमी होणार.
दोन्ही महत्वाच्या शहरांमधील अंतर केवळ 12 मिनिटांवर येणार.
या मार्गावर दररोज किमान 1 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज.
कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टनांनी घट होणार
मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार