व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदी देवाचा अवतार; भाजप मंत्र्यांचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, त्यांचा सामना कोणीही करू शकत नाही असं विधान उत्तरप्रदेशच्या शिक्षण मंत्री गुलाब देवी यांनी केलं आहे. मोदींना पंतप्रधानपदावरून हटवणारे कोणी नाही. त्यांना हवे तितके दिवस ते पंतप्रधानपदावर राहू शकतात असेही त्या म्हणाल्या.

श्री गणेश चौथ उत्सवाचे संस्थापक डॉ. गिरिराज किशोर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी गुलाब देवी चांदौसी शहरात गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मोदी हे देवाने पाठवलेले प्रतिनिधी आहेत. मोदींसारखा यापूर्वी कोणीही नव्हता आणि भविष्यातही कोणी नसेल. ज्याप्रमाणे देव हा सर्वांचा आदर्श आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण देश पंतप्रधानांचे म्हणणे स्वीकारतो. मोदी जेव्हा काही बोलतात, तेव्हा संपूर्ण देश त्याचे पालन करतो. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? असेही त्यांनी सांगितलं.

मोदी हे देवाचा अवतार आहे. मोदींशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. जोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील. त्यांना कोणीही हटवू शकत नाही. नरेंद्र मोदी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे असं म्हणत गुलाब देवी यांनी मोदींची स्तुती केली आहे.