नवी मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार!! मोदींच्या हस्ते मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता

navi mumbai metro line 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांची मेट्रोची (Navi Mumbai Metro) प्रतीक्षा अखेर संपणार आहे. नवी मुंबई मेट्रो अखेर कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 ऑक्टोबरला मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 21 जूनला मेट्रोचे सुरक्षा आयुक्त यांनी ह्या प्रकल्पाबाबत बेलापूर आणि सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान सिडकोला काही प्रमाणपत्र जारी केले होते. ह्यापूर्वी 2021 मध्ये सेंट्रल पार्क ते पेंढार या पाच स्टेशनसाथी CMRS ची प्रमाणपत्र घेतले होते. मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता मात्र मुंबईकरांसाठी ही मेट्रो लवकरच सुरु करण्यात येईल. हा प्रकल्प एवढा का महत्वाचा मानला जातो, त्याची वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊयात.

काय आहेत ह्या प्रकल्पाची वैशिष्ट्य?

या प्रकल्पाची मागणी ही सतत केली जात आहे. कारण ह्या प्रकल्पामुळे या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वाहतूक कोंडीचा होणारा त्रास ह्यामुळे अधिकाधिक कमी होईल. नवी मुंबईच्या ह्या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील खारघर गृहनिर्माण प्रकल्पास फायदा होईल. कारण जर ही मेट्रो लाईन सुरु झाली तर मेट्रो जवळ असल्याचा फायदा घेत घरांची मागणी येथे वाढु शकते. तसेच बेलापूर प्रकल्प हा वृद्धीस येऊ शकतो. त्यामुळे हा मेट्रो मार्ग तयार होणे अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

शहराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या गावांना सार्वजनिक वाहणात केवळ बसचा वापर केला जातो. त्यामुळे इतर सार्वजनिक सुविधा येथे उपलब्ध होत नाहीत. 11.1 किमी पसरलेल्या संपूर्ण लाईन-1 दरम्यान बेलापूर ते पेंढार स्टेशनपर्यंत एकूण 11 स्थानकांचा समावेश आहे. या मेट्रोमुळे घोटा, कोयनाविले, तळोजा, ह्या सारख्या इतर जवळच्या गावांना व तेथील रहिवाश्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांचा प्रवास हा सुखकर होईल.  तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. असे सांगितले जातेय.