पुणे प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान सातवेळा महाराष्ट्रात आले. इथे आल्यावर त्यानीं दोनच गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याने काय केलं आणि दुसरी म्हणजे अर्थातच माझ्यावर त्यांचं असलेलं ‘प्रेम’!. मोदींच या दोन लोकांवर विशेष प्रेम आहे. कारण यांच्या विषयी ये कायम मनात विचार करत असतात आणि हे प्रेम ते जाहिरपणे अनेक सभांमधुन व्यक्त देखील करतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भोर येथे सभेत बोलतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींच्या भाषणबाजी व गांधी-नेहरू कुटुंबाला कायम दोष देण्याच्या मुद्यावर जोरदार टिका केली.
यावेळी पवार म्हणाले, खरे तर नेहरू-गांधी घराण्याने आणखी किती त्याग करायला हवा होता? या कुटुंबातील दोन पंतप्रधानांची हत्या झाली. या घराण्याच्या कर्तृत्वाबद्दल अनेक गोष्टी आहेत. पाकिस्तानने आगळीक केली तर एका महिला पंतप्रधानांने पाकिस्तानला अद्दल घडवली होती. पाकिस्तानचा पराभव करून दोन तुकडे देखील केले होते. मात्र सैन्याच्या शौर्याच कधी भांडवल नाही केल.
मी प्रथम आमदार झालो तेव्हा फोन मिळाला. बारामतीला संपर्क करायचा तर ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. त्यासाठी ५-६ तास थांबावं लागायचं. आज चित्र बदललं. शेतात खुरपं घेतलेल्या स्त्रियाही मोबाइलवर बोलताना दिसतात. ही दळणवळण क्रांती राजीव गांधींनी आणली. तरी मोदी म्हणतात यांनी काय केलं?महाराष्ट्रात आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कारखानदारी, उद्योगधंदे वाढवलेत म्हणून महाराष्ट्रात रोजगार वाढला आहे. हे आताच्या मुख्यमंत्र्यानी विसरु नये.
देशाचे पंतप्रधान सातवेळा महाराष्ट्रात आले. इथे आल्यावर दोनच गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याने काय केलं आणि दुसरी म्हणजे अर्थातच माझ्यावर त्यांचं असलेलं 'प्रेम'!#भोर_सभा pic.twitter.com/hs3bCPd7Sq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 20, 2019