PM Modi : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढला आहे. हा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा फोटो COP28 दरम्यान क्लिक केला होता. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि मेलोनी हे हसताना दिसत आहेत. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या फोटोला #मेलडी असा एक हॅशटॅग दिला आहे. सोशल मीडियावर हा फोटो अनेकांना आवडला व यावर अनेकजण स्वतःचे मत देखील मांडत आहे.
दरम्यान,संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये जागतिक हवामान कृती शिखर परिषद (COP28) आयोजित केली जात आहे. या समितीमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक बडे नेते दुबईला पोहोचले आहेत. दरम्यान, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी उपस्थित होते.
यादरम्यान, मेलोनी यांनी मोदींसोबत काढलेला हा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मेलोनी यांनी हा सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून COP28 मध्ये मोदी हे चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी COP28 परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्येही पीएम मोदी आणि मेलोनी यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांचे एकत्र हसताना आणि गप्पा मारतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान, दुबईत आयोजित COP28 परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री उशिरा भारताकडे रवाना झाले. यादरम्यान, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X यावर ‘धन्यवाद दुबई’ असे म्हटले आहे. तसेच COP28 शिखर परिषद उत्कृष्ट होती. एक चांगला प्लैनेट तयार करण्यासाठी एकत्र काम करत रहा, असे त्यांनी म्हटले आहे.
COP म्हणजे काय आहे ?
आपण थोडक्यात COP बद्दल जाणून घेऊ या. COP म्हणजे पक्षांची परिषद म्हणजे ते देश ज्यांनी 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारावर स्वाक्षरी केली होती. सीओपीची ही 28 वी बैठक आहे. या कारणास्तव याला COP28 म्हटले जात आहे.
COP28 पृथ्वीच्या तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राखेल अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात सुमारे 200 देशांमध्ये यावर सहमती झाली होती.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान निरीक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, 1.5 अंश सेल्सिअस हे एक महत्त्वाचे लक्ष्य आहे ज्याद्वारे हवामान बदलाचे धोकादायक परिणाम थांबवले जाऊ शकतात.