PM Modi Pune Visit। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यात असून सध्या ते लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बोलत असताना त्यांनी, लोकमान्य टिळक पुरस्कार १४० कोटी जनतेला अर्पण करत असल्याचे म्हणले आहे. तसेच “स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. त्यामुळे टिळकांचे गुजरात जनतेसोबत ही विशेष नाते आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या या लढ्यात स्वदेशाचा नारा दिला होता. आता एखाद्या रस्त्याचं नाव बदललं तरी विरोधक हंगामा करतात” असे मोदींनी म्हंटल आहे.
मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “माझे महाराष्ट्राच्या भूमीला कोटीकोटी वंदन. हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पावन भूमीवर मला येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. लोकमान्य टिळकांनी भारत स्वातंत्र्यलढ्याची पूर्ण दिशाच बदलून दिली होती. लोकमान्य टिळक हे आपल्या स्वतंत्र लढ्यामध्ये कपाळावरील तिलक आहेत.” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी या पुरस्कारासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मोदींनी सांगितला ‘तो’ इतिहास- (PM Modi Pune Visit)
पुढे बोलताना मोदी म्हणले, “स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. सरदार पटेलही टिळकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केलं होतं. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या जनतेच टिळकांशी विशेष नात आहे. टिळक लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे. टिळकांनी लोकांना स्वातंत्र्याचा विश्वास दिला. त्यांना इतिहास, संस्कृती, लोकांवर आणि भारताच्या सामर्थ्यावर विश्वास होता” असे नरेंद्र मोदींनी आवर्जून सांगितले आहे. मुख्य म्हणजे, “लोकमान्य टिळकांच्या कार्याला आपण काही घटनांमध्ये शब्दांमध्ये आपण बांधू शकत नाही. लोकमान्य टिळकांच्या वेळी आणि नंतर स्वातंत्र्यलढ्यात जेवढे नेते सहभागी होते त्यांच्यामध्ये टिळकांची छाप दिसून येते असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुण्यातील (PM Modi Pune Visit) विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. यादरम्यान पुणे मेट्रोचे उद्घाटन देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. तिथून पुढे १:४५ ते २:१५ नरेंद्र मोदींचा राखीव वेळ असेल. ठीक २:२५ ला मोदी पुणे विमानतळाकडे प्रस्थान करतील. २:५५ वाजता नरेंद्र मोदी पुण्याचा दौरा संपवून दिल्लीसाठी रवाना होतील.