मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, पण देवाच्या आशीर्वादामुळे…. ; मोदींचा विरोधकांवर निशाणा

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. मला दररोज 2-3 किलो शिव्या मिळतात, म्हणून मी थकत नाही. कारण देवाच्या आशीर्वादामुळे मला दिलेल्या शिव्या न्यूट्रिशन मध्ये बदलतात असं त्यांनी म्हंटल.

हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर मोदी जनतेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, काही लोक निराशेमुळे मोदींना सकाळ-संध्याकाळ शिव्या देत असतात. मोदींना शिव्या देण्यासाठी त्यांनी संपूर्ण शब्दकोश वापरला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अशा गोष्टींचा त्रास करून घेऊ नका, कारण त्यांच्याकडे शिवीगाळ करण्याशिवाय काहीच उरले नाही. देवाच्या आशीर्वादामुळे तुम्ही मला दिलेल्या शिव्या न्यूट्रिशन मध्ये बदलतात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी जनतेच्या सेवेत वापरली जाते.

दरम्यान, अमृत ​​काळच्या काळात भारत विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे आणि लवकरच एक विकसित देश बनेल, असे मोदी म्हणाले. विकासाच्या या प्रवासाला अनेक आयाम आहेत. सामान्य लोकांच्या गरजा आणि चांगल्या आणि आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये जोडलेली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर एकाकी विचारसरणीमुळे देशाला कसा त्रास सहन करावा लागला हे आपण पाहिले आहे. त्यामुळे आमचे सरकार नव्या दृष्टिकोनाने चालत आहे असं मोदींनी यावेळी म्हंटल.