हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ‘स्वामित्व’ योजना द्वारे प्रॉपर्टी कार्ड लॉन्च करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी प्रॉपर्टी कार्डचे वितरणही सुरू करतील. या कार्यक्रमास सामील होण्यासाठी शासनाने नोंदणी सुरू केली आहे. 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोंदणी करता येईल, अशी एक लिंक सरकारने जारी केली आहे.या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिलं जाणार आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.
रविवारी सकाळी 11 वाजता या योजनेची सुरूवात होणार आहे. रविवारचा दिवस हा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मालमत्तेशी निगडित प्रॉपर्टी कार्ड बाजारात आणतील आणि त्याचे वितरणही सुरू करतील. असे म्हटले जाते की सुमारे एक लाख मालमत्ताधारक आपल्या मोबाइल फोनवर एसएमएस लिंकद्वारे त्यांचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकतील.
कल का दिन ग्रामीण भारत के लिए एक बड़ा सकारात्मक परिवर्तन लाने वाला है। सुबह 11 बजे स्वामित्व योजना के अंतर्गत संपत्ति कार्ड के वितरण का शुभारंभ किया जाएगा। यह योजना करोड़ों भारतीयों के जीवन में मील का पत्थर साबित होगी। #SampatiSeSampantahttps://t.co/OQUEPSGCjr
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2020
ग्रामीण भागातल्या नागरिकांन आपल्या संपत्तीचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी करता यावा यासाठी एक कार्ड दिलं जाणार आहे. त्याचबरोबर त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर संपत्ती कार्डची लिंक दिली जाणार असून ते कार्ड त्यांना डाऊनलोड करता येईल. नंतर प्रत्यक्ष त्यांना ते कार्ड दिलं जाणार आहे.
6 राज्यातल्या 763 गावांना याचा फायदा होणार आहे. यात महाराष्ट्रातल्या 100, उत्तर प्रदेश 346, हरियाणा 221, मध्य प्रदेश 44, उत्तराखंड 50 आणि कर्नाटकातल्या 2 गावांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’