हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देईल.
कोणकोणत्या विभागात नोकऱ्या-
22 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी मोदी युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. तेव्हा 75 हजार तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. यादरम्यान संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 अक्टूबर को सुबह 11 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए 10 लाख कर्मियों के लिए भर्ती अभियान रोजगार मेले का शुभारंभ करेंगे। समारोह के दौरान 75,000 नवनियुक्त नियुक्तियों को नियुक्ति पत्र सौंपे जाएंगे। pic.twitter.com/1KdiKeLCvp
— ANI_HindiNews (@AHindinews) October 20, 2022
या कार्यक्रमात ओडिशातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, चंदीगडमधून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर , महाराष्ट्रातून वाणिज्य मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत. राजस्थानमधून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, झारखंडचे अर्जुन मुंडा आणि बिहारचे गिरीराज सिंह सहभागी होणार आहेत.