पंतप्रधान मोदींचा नागपुरात तिकीट काढून मेट्रोतून प्रवास; विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर ठीक 9.30 वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर ते नागपूर मेट्रो फेज 1 च्या शुभारंभासाठी ते दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते मेट्रो प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. नंतर त्यांनी स्वतः तिकीट खरेदी करून मेट्रोतून प्रवास केला. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

 

आज पंतप्रधान मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी प्रकल्पाची माहितीही घेतली. संबंधित मेट्रो हि खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर अशी धावणार आहे. नागपूर मेट्रोचा पहिला आणि दुसरा टप्पा हा नागपूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.