गलवान खोऱ्यातील जखमी जवानांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लेह । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह दौऱ्यावर आहेत. भारत-चीन सीमेवर तैनात जवानांशी संवाद साधल्यानंतर ते गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत जखमी झालेल्या जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले. लेहमधील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या जवानांना पंतप्रधान मोदींनी येवेळी संबोधित केलं. ‘आपल्यासोबत आज नाहीत ते खूपच शूर होते. त्यांनी योग्य प्रत्यूत्तर दिलं. तुमचं रक्त नेहमीच तरुणांना प्रेरणा देत राहील’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी या जवानांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. ‘तुमच्यासारख्या जवानांमुळेच आपला देश आत्तापर्यंत कुणासमोर झुकलेला नाही आणि यापुढेही झुकणार नाही’, असंही पंतप्रधानांनी जवानांना उद्देशून म्हटलं.

सैनिकी रुग्णालयात जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला प्रणाम करतो. तुम्हाला जन्म देणाऱ्या मातांनाही शत्-शत् नमन करतो, ज्यांना तुमचं पालन-पोषण केलं आणि देशाला अर्पण केलं. जगातील कोणत्याही शक्तीसमोर आपण कधीही झुकलेलो नाहीत आणि झुकणारही नाही, हे मी बोलू शकतोय त्याचं कारण फक्त तुमच्यासारखे वीर पराक्रमी सहकारी आहेत. १३० कोटी देशवासियांना तुमच्या प्रती अभिमानाची भावना आहे. तुमचं हे साहस आणि शौर्य आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही जे रक्त सांडलंय ते आपल्या तरुण पीढीला आणि देशवासियांना भविष्यात दीर्घकाळापर्यंत प्रेरणा देत राहील’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्री मोदी संरक्षणप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासोबत लेहच्या दौऱ्यावर दाखल झाले. लेहमधील नीमूतील सैनिक तळाला भेट देत त्यांनी जवानांशी थेट संवाद साधला. यावेळी, भारतीय जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. तसेच पंतप्रधान मोदींनी चीनला खडे बोल सुनावले. ‘आज विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीन अप्रत्यक्षरित्या चीनला सूचक इशारा दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment