‘आंदोलनजीवी’ शब्दावर पंतप्रधान मोदींनी मारली पलटी; म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांचा सरकार करते आदर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषांवेळी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ शब्दांवर नमतं घेतलं. आंदोलकांसाठी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे टीकेचे धनी बनललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सावध पावलं टाकली. आंदोलनजीवी शब्दप्रयोगावर टीका झाल्यानंतर आज मोदींनी आदराची भाषा वापरली. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवी’ करत असल्याचे मोदी म्हणाले.

हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. सोबतच दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा परवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी म्हणाले की, “सातत्याने शेतकऱ्यांशी बातचीत सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली आहे. जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे.”असं मोदी म्हणाले.

शेतकरी आंदोलन हे पवित्र आहे. पण आंदोलनजीवींनी पवित्र आंदोलन हायजॅक करून शेतकऱ्यांचे आंदोलन अपवित्र करण्याचा प्रयत्न केला आहे असं मोदी म्हणाले. हरयाणात टोल नाके तोडने, वसुली रोखणे हे आंदोलनजीवींचे काम आहे. पंजाबमध्ये दूरसंचार टॉवर तोडणं हे आंदोलनजीवींचे काम आहे, असं सांगत मोदींनी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात जिओच्या टॉवरवर केलेल्या कारवाईवर भाष्य केलं.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदींच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केला. यावर काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका, तर लोकसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस आहे अशी कडवट टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

 

 

You might also like