Thursday, February 2, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंप्रमाणे स्वतः मध्ये बदल करावा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांच्यासोबत ‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले.

व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा यांनी उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळेपणाने विचार करणारे आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे आता बदलले असून वडिलांच्या विचारसणीप्रमाणे न चालता ते राजकीय मार्गावर समतोल राखत चालण्याचा आणि मुख्य प्रवाहातील राजकारणाचा विचार करताना दिसत आहेत. त्यांनी निश्चय करुन आणि यशस्वीपणे हा बदल घडवून आणल्याचे रामचंद्र गुहा यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी मोदींच्या धोरणावर देखील टीका केली. श्री. गुहा यांनी मोदींच्या सुयोग्य मंत्रिमंडळावर तसेच सर्वोच्च न्यायालयासह देशातील प्रमुख संस्थांना देशाच्या रसातळात जाण्यासाठी दोष दिला. ते म्हणतात की पंतप्रधानांच्या आजूबाजूला जमलेले अधिकारी आणि नोकरशहा या बिघडलेल्या परिस्थितीस जबाबदार आहेत तरी या सर्व घटनांचा नाश करण्याची मुख्य जबाबदारी पंतप्रधानांच्या खांद्यावर येते.

मोदींना प्रत्येक गोष्टीचे श्रेय स्वत: हून घ्यायचे आहे. मागील सरकारांच्या प्रत्येक चांगल्या कामाचा ते इन्कार करतात . त्यांच्या स्वत: च्या सरकारच्या उणिवांबद्दल, ते राज्य सरकार आणि विरोधकांना जबाबदार धरत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना चुकांच्या उत्तरदायित्वासाठी पुढे ठेवले जाते असेही त्यांनी म्हंटल.