नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दिव्य विजया नंतर नरेंद्र मोदी यांनी आज ३० मी रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेण्याचे आयोजिले आहे. या शपथ विधी सोहळ्याचे विशिष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील एका हि व्यक्तीला या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या बहीण वासंतीबेन यांनी नरेंद्र मोदी यांनी घरातील कोणालाच शपथ विधीचे आमंत्रण दिले नाही असे म्हणले आहे. याचे कारण देखील काही खास सांगितले नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी देशासाठी परिवाराचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांनी परिवारातील कोणालाच आमंत्रित केले नसावे असे त्यांच्या भगिनी वसंतीबेन यांनी सांगितले आहे.
आपण दर राखी पौर्णिमेला आपल्या भावाला म्हणजे नरेंद्र मोदी यांना राखी पाठवतो. तसेच मागील राखी पौर्णिमेला आपण त्याला समक्ष भेटून राखी बांधली होती असे नरेंद्र मोदी यांच्या बहिणीने म्हणले आहे. त्यावेळी आपण आपल्या भावाला गरिबांच्या मुलांसाठी काम करत रहा असे सांगितले होते असे वासंतीबेन म्हणाल्या आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीला त्यांच्या मंत्री मंडळातील सर्व सदस्यांच्या परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र २०१४ प्रमाणे या हि वेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या परिवाराला शपथ विधीला आमंत्रित केलेले नाही.