हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. यावेळी कोरोना काळात दिवस रात्र जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लस टोचून घेणार आहे. याच टप्प्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही लसीकरण होणार आहे. लोकांमध्ये असलेली करोना लसीबद्दलची साशंकता दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत मुख्यमंत्री आणि इतर नेतेही करोना लस घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.
करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे. याच टप्प्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार ज्यांचं वय ५० वर्षांहून अधिक आहे अशांना करोना लस देण्यात येणार आहे. असं असलं तरी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला नेमकी कधी सुरुवात होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’