हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेली पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी नेहमीच उत्तम ऑफर लाँच केल्या जातात. आताही बँकेकडून आपल्या ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल ऑफर दिली जाते आहे. हे लक्षात घ्या कि, आता बँकेने सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता PNB कडून 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर अतिरिक्त 80 बेस पॉइंट्स दिले जात आहे. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतीवर अतिरिक्त व्याजदर मिळेल.
पीएनबीकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सर्वाधिक व्याज
सामान्यत: बँका ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षे आणि त्याहून जास्त) सामान्य लोकांच्या एफडी दरांपेक्षा (50 बेसिस पॉइंट्स) जास्त व्याज दर, देतात. मात्र आता सध्या ज्येष्ठ नागरिकांना फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याजदर देणारी PNB ही पहिली बँक ठरली आहे.
PNB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीसाठी लागू असलेल्या कार्ड दरापेक्षा 80 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याज दर मिळेल. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचारी सदस्य जे सुपर ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, त्यांना सर्व कालावधीसाठी 180 बेसिस पॉइंट्स व्याजदर मिळतील.
सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएनबीचे नवीन एफडी दर
13 सप्टेंबर रोजी PNB कडून सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व कालावधीसाठी FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. बँकेकडे 7 दिवसांपासून ते जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत FD दिल्या जात आहे. तसेच सुपर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 1111 दिवसांच्या FD वर 3.80% ते 6.55% पर्यंत व्याजदर मिळत आहेत.
आता Whatsapp वर मिळणार सर्व माहिती
आपली बँकिंग सेवा आणखी सुलभ करण्याच्या प्रयत्नात, PNB कडून कस्टमर आणि नॉन-कस्टमर या दोघांसाठी WhatsApp च्या माध्यमातून बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. आता WhatsApp बँकिंग सेवा Android आणि iOS-बेस्ड मोबाइल फोनवर 24×7 उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा
Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या
FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा
PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे