हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बँकेकडून ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट दुप्पट करण्यात आली आहे. आता पीएनबीच्या ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डद्वारे जास्त पैसे काढता येतील. हे लक्षात घ्या कि, याआधी फक्त 50 हजार रुपयांपर्यंतच पैसे काढता येत होते.
आता बँकेच्या प्लॅटिनम मास्टरकार्ड, व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड आणि रुपे कार्डवरील एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट 1 लाख रुपये करण्यात येत असल्याचे PNB ने सांगितले आहे. यापूर्वी या कार्डधारकांना एटीएममधून फक्त 50,000 रुपये काढता येत होते. लवकरच ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्ड ट्रान्सझॅक्शन लिमिट आणखी वाढवण्यात येणार असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
आता PNB कडून पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS चे लिमिटही वाढवण्यात आले आहे. आता अशा कार्डधारकांचे डेली POS लिमिट 1.25 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्यात आले आहे. या कार्डद्वारे आता कोणत्याही दुकानामध्ये POS द्वारे 3 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे.
सध्या, PNB च्या ग्राहकांचे एटीएममधून डेली कॅश काढण्याचे लिमिट 25,000 रुपये तर एका वेळी कॅश काढण्याचे लिमिट फक्त 20,000 रुपये आहे. सध्या ग्राहकांना POS द्वारे 60,000 रुपये काढण्याची संधी दिली जाते आहे. मात्र काही विशिष्ट कार्डांवरच हे लिमिट वाढवले जात आहे.
याशिवाय ग्राहकांसाठी कॅश काढण्याचे लिमिटही 50 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत, व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड धारकांना डेली कॅश काढण्याची लिमिट रुपये 1.25 लाख होते तर एटीएममधून एका वेळी फक्त 20,000 रुपये काढता येत होते.
PNB ने RuPay सिलेक्ट आणि व्हिसा सिग्नेचर सारख्या कार्डधारकांसाठी एटीएम कॅशची डेली काढण्याची लिमिट देखील 50,000 रुपयांवरून 1.5 लाख रुपये केली आहे. इतकेच नाही तर अशा ग्राहकांसाठी POS लिमिट आता 5 लाख रुपये असेल, जे पूर्वी फक्त 1 लाख 25 हजार रुपये होते.
बँकेने सांगितले आहे की,”आता ग्राहकांना आपल्या कार्डचे लिमिट स्वतः कस्टमाइझ करता येईल. यासाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, PNB ATM, IVR द्वारे आणि बँकेच्या शाखेत जाऊन पूर्ण करता येईल.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/ATM-Debit-Card.html
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा