हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता बँकेकडून चेक क्लिअरन्सशी संबंधीचे नियम बदलण्यात आले आहेत. PNB ने ग्राहकांना सांगितले की,”आता मोठ्या रकमेचे चेक क्लिअर करण्यापूर्वी किमान एक दिवस आधी बँकेला कळवावे लागेल.” हे लक्षात घ्या कि, चेक क्लिअरन्सशी संबंधित फसवणुक रोखण्यासाठी PNB कडून ही एडव्हायझरी जारी केली गेली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या ग्राहकांना चेक पेमेंटशी संबंधित पॉझिटिव्ह पे सिस्टीम अंतर्गत माहिती शेअर करावी लागेल.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने या संदर्भात पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) तयार केली होती. या अंतर्गत जास्त व्हॅल्यू असलेल्या चेक जारी करणार्या ग्राहकांना चेक नंबर, चेकची रक्कम, तारीख आणि लाभार्थीचे नाव पुन्हा व्हेरिफाय करावे लागेल.
10 लाख आणि त्यावरील चेकसाठी PPS बंधनकारक आहे
PNB ने आपल्या ग्राहकांसाठी 10 लाख आणि त्याहून जास्तीच्या रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम बंधनकारक केले आहे. 4 एप्रिल 2022 रोजी बँकेकडून 10 लाख आणि त्याहून जास्त व्हॅल्यूच्या चेकसाठी PPS सिस्टीम लागू केली गेली होती.
याविषयी एक निवेदन देताना बँकेने म्हटले की, “बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी आणि चेक रिटर्न टाळण्यासाठी ग्राहकांना आपल्या चेकचे डिटेल्स क्लिअरन्सच्या किमान एक कामकाजाच्या दिवस आधी सबमिट करावे लागेतील.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/
हे पण वाचा :
Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!
EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!
Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले
Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!
PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!