PNB देत आहे स्वस्तात घर खरेदीची संधी, त्याविषयीची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्तात घर घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. PNB प्रॉपर्टीजचा लिलाव करणार आहे. 26 नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यामध्ये रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर प्रॉपर्टीजचा समावेश आहे.

बँका वेळोवेळी लिलाव करतात
ज्या प्रॉपर्टीजच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही अथवा काही कारणाने देऊ शकलेले नाही. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांकडून ताब्यात जातात. अशा प्रॉपर्टीजचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात प्रॉपर्टीज विकून बँक आपली थकबाकी वसूल करते.

PNB ने ट्विट करून दिली माहिती
PNB ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”मेगा ई-ऑक्शन 26 नोव्हेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये रेसिडेंशियल आणि कमर्शियल प्रॉपर्टीजचा ई-ऑक्शन केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत प्रॉपर्टीज खरेदी करू शकता.”

अधिक माहितीसाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
प्रॉपर्टीजच्या लिलावाबद्दलच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ibapi.in/ या लिंकला भेट देऊ शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, ते लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तेचे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, लोकेशन, मोजमाप आणि इतर माहिती देखील देतो. जर तुम्हाला ई-ऑक्शनद्वारे प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीजची कोणतीही माहिती मिळवू शकता. 29 डिसेंबर रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.

Leave a Comment