हॅलो महाराष्ट्र । पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) वेळोवेळी देशातील महिलांसाठी नवनवीन योजना आणत असते. PNB ने यावेळीही महिलांसाठी विशेष एक खास पॉवर सेव्हिंग अकाऊंटची सुविधा आणली आहे. ही महिलांसाठीची एक खास योजना आहे, ज्याद्वारे आपण अकाउंट उघडू शकता आणि अनेक खास योजनांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये, आपण जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता, परंतु यासाठी, खात्यातील पहिले नाव हे एका महिलेचे असावे. चला तर मग या खात्याबद्दल तपशीलवार जाणून घेउयात-
PNB ने ट्विटरवर माहिती दिली
PNB ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या खात्याबद्दल माहिती दिली आहे. “PNB पॉवर सेव्हिंग्ज ही महिलांसाठीची एक खास योजना आहे. या योजनेंतर्गत एक जॉईंट अकाउंट देखील उघडता येते पण यात पहिले नाव हे एका महिलेचे असावे.”
किती अकाउंट उघडता येतील?
आपण हे अकाउंट खेड्यात किंवा शहरात कोठेही उघडू शकता. हे खाते तुम्ही खेड्यात 500 रुपयांत उघडू शकता. याशिवाय तुम्ही नीम-शहरी भागात 1000 रुपये घेऊन हे खाते उघडू शकता. त्याचबरोबर, शहरी भागात आपण हे खाते 2 हजार रुपयांनी उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी संबंधित महिलेचे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
या खात्याचे वैशिष्ट्य काय आहे
1. या खात्यात आपणास 50 पानांचे चेकबुक फ्री मिळते.
2. याशिवाय NEFT ची सुविधा फ्री मध्ये उपलब्ध आहे.
3. या खात्यावर प्लॅटिनम डेबिट कार्ड बँक फ्री मध्ये उपलब्ध आहे.
4. फ्री SMS अलर्टची सुविधा उपलब्ध आहे.
5. 5 लाख रुपयांपर्यंत फ्री एक्सीडेंटल डेथ इंश्योरेंस कवर उपलब्ध आहे.
6. तुम्ही दररोज 50 हजार रुपयांपर्यंतची कॅश काढू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.