हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील या मोठ्या सरकारी बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. यानंतर आता या बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच बँकेचे हे नवीन दर 1 मार्च 2023 पासून लागू होतील.
असे असतील नवीन दर
PNB च्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, बँकेने ओव्हरनाईट MCLR 7.90% वरून 8.00% पर्यंत वाढवला आहे. तसेच आता एका महिन्याच्या कर्जासाठीचा MCLR 8.10%, 3 महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 8.20% आणि 6 महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 8.40%, एका वर्षाच्या कर्जासाठीचा MCLR 8.50% आणि तीन वर्षांसाठीच्या कर्जासाठीचा MCLR 8.80% निश्चित केला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे