शिराळा : हॅलो महाराष्ट्र – शिराळा तालुक्यातील करमाळे, पाडळी, शिवणी तलावांमध्ये विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. ह्या माश्याला समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याअगोदर शासनाने हे मासे नष्ट करावेत अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज खरेदी केले. मात्र संबंधित व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्यांची फसवणूक करून मांगूर माशांचे बीज दिले. ती लहान पिल्ले असल्याने त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. त्यानी तसेच बीज पाण्यात सोडले. ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत पुढे सरकत करमाळे, पाडळी, शिवणी तलावांसह आता मोरणा धरणामध्ये आली आहेत.
हा मासा खाल्ल्यावर लोकांना कर्करोगासारखे रोग होतात, तसेच जीवास धोखा निर्माण होतो. यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा मासा मांसाहारी असल्याने बाकीच्या माश्यांना खातो. तसेच तो मोठा झाल्यावर लहान मुले, कुत्री यांनादेखील खातो. त्यामुळे तो संपूर्ण नष्ट करणे गरजेचे आहे. पण मोरणा धरणातील पाणी कधीही संपत नाही त्यामुळे या धरणातील मासा संपूर्ण नष्ट करणे अवघड आहे.
शिराळा येथील काही शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना मांगूर माश्याचे बीज देण्यात आले. हा मासा मांसाहारी असल्याने बाकी माश्यांना खातो. तसेच तो मोठा झाल्यावर या परिसरातील पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुले, कुत्री यांना आपले भक्षक बनवू शकतो. यामुळे शासनाने हा मासा समूळ नष्ट करावा. असे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष महादेव कदम यांनी सांगितले आहे.