धक्कादायक ! बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हि घटना उल्हासनगरमधील कॅम्प नंबर २ परिसरात आहे. आणि ह्यामध्ये अजून धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा आरोपीदेखील अल्पवयीनच आहे. त्याने ब्लेडने या मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले आहेत. यामध्ये ती मुलगी खूप गंभीर जखमी झाली आहे. त्यामुलीवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
उल्हासनगरमधील कॅम्प ३ चोपडा कोर्ट भागात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडील नसल्याने आपल्या आत्यासोबत राहते. गुरुवारी सायंकाळी ही अल्पवयीन मुलगी कॅम्प नंबर २ भागात असलेल्या महापालिकेच्या बाल उद्यानामध्ये बसली असताना तिच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आला तेव्हा त्याने तू माझ्याशी बोलत का नाहीस? असे विचारले. मात्र त्या मुलीने मला तुझ्याशी बोलायचे नाही आहे असे या अल्पवयीन मुलीनं त्याला सांगितले. यानंतर या आरोपीने रागाच्या भरात आपल्या खिशात असलेल्या ब्लेडच्या सहाय्याने तिच्यावर वार केले.

हि घटना घडताना त्या मुलीने आपल्या बचावासाठी आरडाओरड केली तेव्हा त्या आरोपीने तेथून पळ काढला. या दरम्यान या मुलीला एका व्यक्तीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या मुलीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या मुलीची आणि आरोपीची पहिल्यापासून ओळख होती. त्याचे अनेकदा बोलणेदेखील झाले होते. मात्र यानंतर अचानक या मुलीने आरोपीशी बोलणे बंद केले. यामुळे रागाच्या भरात त्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे.