सराईत मंगळसूत्र चोराला पोलिसांनी पोलिसांनी केले अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या कुख्यात आरोपीला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन मंगसूत्र आणि दोन घरफोडीचे गुन्हे सिडको पोलिसांकडून उघडकीस आले आहेत. वैभव गजानन इंगोले वय २३, (रा. कमळापूर फाटा, हनुमाननगर, रांजणगाव शेणपुंजी) असे आरोपीचे नाव आहे.

एन-5 सिडको भागातील सत्यमनगर या परिसरात आरोपी संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली. माहितीच्या आधारे विशेष पथकाचे उपनिरीक्षक कल्याण शेळके व त्यांच्या विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनतर त्याने एक वर्षांपूर्वी गजानननगर एन -11 हडको परिसरात पै चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवल्याची कबुली दिली आहे.

हे प्रकरण घडल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, पोलीस कोठडीत असल्यावर आरोपीने सिडको परिसरातील दोन महिलांचे मंगळसूत्र चोरले होते आणि घरफोडी केल्याचेही कबुल केले. आरोपीकडून सोन्याचे दागिने टीव्ही व कॅमेरा ई. वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिस उपयुक्त दीपक गिर्हे, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणावर कारवाई केली आहे.

Leave a Comment