पोलीसांनी पाठलाग करून पकडला 47 किलो गांजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । आंध्र प्रदेशातून कारमध्ये अर्धा क्विंटल गांजा घेऊन औरंगाबाद व पुणे येथे जाणा या आंतरराज्यीय तीन गुन्हेगारांना पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी पहाटे पाठलाग करून अटक केली . त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४८ किलो गांजा व कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ . राहुल खाडे यांनी दिली.

पोलुमल्ली दुर्गाप्रसाद अप्पाराव तुर्क गोदावरी,दुर्गन रामेन लक्ष्मण,कोसुरी सतीश पट्टराव,दोघे रा . राज कुलमंडी ,केडमी राकेश अप्पाराव राहणार नेसलीपट्टम जि विशाखापट्टणम,आंध्र प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत .पोलिसांना चकवा देऊन पसार होत असताना दुर्गन रामेन लक्ष्मण रा . राज कुलमंडी हा जखमी झाला पुंडलिकनगर पोलिसांची २ पथके परिसरात गस्तीवर असताना गारखेडा हुसेन कॉलनीत आंध्र प्रदेशातून गांजा विक्रीला येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली . त्यावरून कार पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला . झाल्टा फाटा येथे एमएच ०६ एएस ५०२८ पांढ – या रंगाची कार पोलिसांच्या नजरेस पडली . खाजगी वाहनाने तिचा पाठलाग सुरू केला .

वाहतूककोंडीत अडकलेली गाडी काढता न आल्याने पोलीस आपना पाठलाग करीत आहेत , असे समजून एकाने खाली उडी मारून पळ काढला .आरोपींनी कारमधून देवळाई चौकाकडे पळ काढला . त्यानंतर कार हुसेन कॉलनी गारखेडा परिसरात थांबली असता पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता प्लास्टिकच्या गोणीत अर्धा कुंटल गांजा मिळून आल्याने तिघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.असून आरोपींना मराठी , हिंदी भाषा समजत नसल्याने दुभाषिकाला बोलावून चौकशी करण्यात आली असल्याचे साह्ययक आयुक्त गुणाजी सावंत यांनी सांगितले

इत्तर महत्वाच्या बातम्या –

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

Leave a Comment