भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी इंदूरच्या गवली पॅलासिया भागातील आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ह्या दोघी मागच्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्यांना पुरवत होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघी बहिणी रस्त्यावर चालताना फोनवर बोलत होत्या. यावेळी सैन्याच्या गुप्त विभागाने त्यांची फ्रिक्वेंसी पकडली आणि हा सगळा प्रकार समोर आला.
यानंतर या दोघी बहिणींवर नजर ठेवण्यात आली. ४ दिवसांपूर्वी इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस आणि स्थानिक सैन्य गुप्तचर विभागाच्या टीमने या दोघींच्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्यांना या दोघींच्या घरी अनेक वाहने येत राहिल्याने लोकांना संशय आला यामुळे हे सगळं प्रकरण समोर आले. आता राष्ट्रीय इन्वेस्टिगेशन एजन्सीकडून त्यांची चौकशी केली जाऊ शकते. या दोघी बहिणींची नावे कौसर आणि हिना आहेत. या दोघींची चौकशी करण्यात येत आहे. या दोघा बहिणींकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच या दोघांना मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दोघी बहणींचे वडील सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंदूरमधील एसबीआयच्या शाखेत सुरक्षारक्षक म्हणूनदेखील काम केले होते. आता त्यांचे निधन झाले आहे.
या दोघी बहिणींनी अनेक ठिकाणी नोकरी केली आहे. पण या दोघीही कोणत्याच ठिकाणी जास्त काळ टिकून राहिल्या नाहीत. हिना हि महूमध्ये विजेच्या कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करत होती. हिना मागील सहा महिन्यांपासून प्राइम वन एजन्सीच्या माध्यमातून कॉमप्युटर ऑपरेटर म्हणून काम पाहात होती अशी माहिती हिना ज्या ठिकाणी काम करत होती त्या कंपनीने दिली आहे. पण काही दिवसांनी तिला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. हिने वेगवेगळ्या ठिकाणी काम करून काम करून वेगवेगळी माहिती जमा केली होती.