विनाकारण वाहने अडवण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करता येईल तक्रार

सोलापूर | वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये विनाकारण वाहन अडवल्यावरून वाद निर्माण झाल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पोलीसही चौकाचौकांमध्ये थांबून गाडी अडवत असल्याच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. गाडी आढळल्यानंतर वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि कागदपत्रामध्ये तुटी शोधायला सुरुवात करतात. अशातच मोठ्या मानसिक त्रासाला आणि भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. यासाठी सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक नवीन आदेशच काढला आहे. यामध्ये पोलिस विनाकारण वाहने अडवू शकणार नाही. तसे केल्यास पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करायची. तसेच, विनाकारण गाडी थांबून त्रास देणाऱ्या पोलिसांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहेत. असे आदेश सोलापूर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. विनाकारण गाडी थांबवल्यास यापुढे वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. नाकाबंदी करताना संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या पोलिस ठाण्यात नोंदणी करून कंट्रोल रूमला त्याची माहिती देणे यापुढे बंधनकारक असणार आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अमलदार विनाकारण कोणत्याही वाहनाला अडवून त्रास देत असल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस अधीक्षकांकडे येत होत्या. यामुळे हे आदेशाचे परिपत्रक काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अशाप्रकारे विनाकारण वाहन अडविण्याची घटना घडल्यास 0217-27332000 आणि 0217 -2732009 या क्रमांकावर फोन करून तक्रार दाखल करता येणार आहे. सोबतच 7264 885901 आणि 7264885902 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार देता येऊ शकणार आहे. यासह, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना अजिबातच सोडण्यात येऊ नये. त्यांच्यावर मोठी कडक कायदेशीर कारवाई करावी. असेही आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like