औरंगाबाद – वाळुज हद्दीतून वाळूची वाहतूक करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी करणाऱ्या शहर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक आस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्याचा गेम करणाऱ्या तक्रारदारानेच अधिकाऱ्याचा गेम केल्याची चर्चा रंगली आहे.
एसीबीकडे वाळूचा व्यवसाय करणाऱ्या एकाने वाळूज वाहतूक विभागाचे निरीक्षक जनार्दन साळुंखे (45) हे मासिक हप्ता म्हणून पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार नोंदवली होती. एसीबीचे निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना साळुंखे यास रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजपूत, हवालदार राजेंद्र जोशी, भूषण देसाई, केवलसिंग गुसिंगे, मिलिंद इप्पर, चांगदेव बागूल यांच्या पथकाने केली.