बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मचाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार; उस्मानाबाद येथील घटनेने खळबळ

Balrampur Rape Victim
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद । राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याचा आरोप ताजा असतानाच आता उस्मानाबाद येथे एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मच्याने बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. सदर महिलेने आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिली असल्याचं समजत आहे.

15 दिवसापुर्वीच पारधी समाजाच्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर पोलिसाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

दरम्यान, बलात्काराच्या सलग दोन प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांचे कृत्य समोर आल्याने आता यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे व बलात्कार केल्या प्रकरणी हरिभाऊ कोळेकर या पोलिसाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.