हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोलापूरमध्ये येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 11 पीडित मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. या मुली ठाणे, मुंबई, पश्चिम बंगाल, कलकत्ता राज्यातून सोलापूरमध्ये आल्या होत्या. साधारणता या मुलींचे वय 25 दरम्यान होते. त्यांच्यासह काही महिला ही होत्या. या सर्व मुली आणि महिला हुमन ट्रॅफिकिंग तसेच कोणाच्या तरी सांगण्यावरून वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकल्या होत्या. आता या सर्व मुली आणि महिलांची ग्रामीण पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.
गेल्या 24 जानेवारीपासून ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोलापूरमधील बार्शी, मंगळवेढा, कुर्डुवाडी व माळीनगर रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली होती. बनावट ग्राहक पाठवूनच पोलीस या सर्व घटनेमागचा छडा लावत होते. पुढे हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेश्या व्यवसायात मुलींना आणलेल्या व्यक्तींना अटक केली. तसेच , तब्बल 11 मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढले. या सर्व मुली आपल्या वेगवेगळ्या कारणांना घेऊन वेशा व्यवसाय अडकल्या होत्या.
महत्वाचे म्हणजे, पोलिसांनी ज्या मुलींना ताब्यात घेतले आहे त्यातील कोणत्याही मुलीला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे त्या सर्व मुलींना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आता पोलिसांनी, या वेश्या व्यवसायात मुलींना अडकवलेल्या संशयितांना अटक केली आहे. तसेच या सर्व मुली सोलापूरमध्ये कशा आल्या? यामागे नेमका कोणाचा हात होता याचा तपास घेतला जात आहे. परंतु सोलापूरमध्येच हा सर्व प्रकार घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.