औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद शहरात एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण शहरात रंगू लागली आहे. त्याचे झाले असे कि एमजीएम विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ‘आयटम’ संबाेधिल्याने पाेलिस हवालदाराच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर संबंधित मुलाने विद्यार्थिनीच्या तिघा मित्रांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित दोघांनी परस्पर विराेधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
एमजीएम महाविद्यालयातील विद्यार्थिनी तिच्या तिघा मित्रांसोबत महाविद्यालय नजीकच्या हॉटेलात चहा घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी संबंधित मुलाने तिला ‘आयटम’ म्हणून हाक मारली तसेच तिच्याकडे पाहून काही हावभाव केले. यावेळी विद्यार्थिनीच्या मित्रांनी संबंधितांस हटकले. त्यानंतर दाेन गटात धक्काबुक्की झाली. यानंतर हवालदाराच्या मुलाने पाेलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार संबंधित विद्यार्थिनीच्या तिघा मित्रांविरोधात मारहाणाची गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनीने देखील हवालदाराच्या मुलाने केलेल्या कृत्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पाेलिसांनी हवालदाराचा मूलगा प्रतीक राजेश भोटकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. प्रतीक याच्याबरोबर पीयूष चंद्रकांत देशमुख आणि आणखी एक जणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सिडको पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल करून घेतले आहेत.