विशेष प्रतिनिधी । अयोध्या खटल्याच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने राज्यासह देशभरातील पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पहारा देत आहेत. पोलिसांचे सोशल मीडिया वर बारीक लक्ष असुन नागरिकांनी चुकीचे मेसेज पुढे पाठवले तर संबंधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभर सायबर सेल सोशल मीडियाव लक्ष ठेवून आहेत. राममंदीरा संदर्भात कोणताही मैसेज किंवा स्टेटस दिसल्यास तत्काळ त्या व्यक्तीला फोन करून संबंधित पोस्ट हटवण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जर सूचनेचे पालन करण्यात आले नाही तर त्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येणार आहे.
वर्तमान काळात जास्त अफवा ह्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरतात. म्हणून पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने स्पेशल टिम शहरांमध्ये गठीत केल्या आहेत. असंवेदनशील मॅसेज ,व्हाट्स ऍप ग्रुप, स्टेटस, फेसबुक पोस्ट, ट्विटर , इन्सटाग्राम वर पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान ‘संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन ठीक ठिकाणी पोलीसांची काही पथके पेट्रोलिंग देखील करत आहेत’ अशी माहिती अहमदनगर पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांनी दिली आहे. दरम्यान राम जन्मभूमीचा निकालानंतर राज्यात शांतता राहावी म्हणून पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या मिंटींग घेऊन सुचना दिल्या होत्या. तसेच संवेदनशील भागातील समाजकंटकांना पोलिसांकडून नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या.