कोरोना लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. दरम्यान आता औरंगाबाद येथे कोरोनाची लस घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय.

औरंगाबादेतील एका पोलिसांनं आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अखेर उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय. भास्कर शंकर मेटे हे पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

दरम्यान, कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कोरोना रुग्णांच्या घरातील लोकांनाही व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशन पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment