कोरोना आजार येईल हे अल्लाला २०११ सालीच माहित होतं ; आव्हाडांच्या विधानाने नवा वाद ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.हा व्हिडिओ खरा असून मुंब्र्यात एका कब्रस्थानच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय.

या व्हिडिओत आव्हाड म्हणतात की “कोरोना येणार आहे हे अल्लाला २०११ सालीच समजले होते. त्यामुळेच मुंब्य्रात कब्रस्थानासाठी जमीन प्राप्त झाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थान बांधून पूर्ण झाले, असे आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणत आहेत. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान,गेल्या वर्षभरात अनेक लोकांचे बळी या कोरोना विषाणूमुळे गेले आहेत. अजूनही या आजाराचे थैमान चालूच आहे अशावेळी आव्हाड यांच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्याना चांगलेच कोलीत हातात मिळाले आहे.यामुळे आव्हाडांना प्रचंड ट्रोल केलं जातंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like