सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांच्यात महेश शिंदे यांचा समावेश असून त्यांचा मोबाईल नंबर दुसरीकडे ट्रान्सफर केला आहे. गुजरातमधील एका हाॅटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचेही आता या बातमीकडे लक्ष लागून राहणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील आमदार महेश शिंदे यांनी नेहमीच महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतलेल्या अनेकदा पहायला मिळालेल्या आहेत. किसनवीर कारखाना असो की रयत शिक्षण संस्था या माध्यमातून त्यांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षाला विरोध दिसून आला आहे. कोरेगाव मतदार संघात महेश शिंदे यांचा मोठा संघर्ष हा राष्ट्रवादीशी पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या दोन नेत्यांच्यात वारंवारं वाररूम दिसून आला आहे. सातारा जिल्हा बॅंक असो की कोरेगाव नगरपंचायत निवडणूकीपासून छोट्या निवडणूका तेथे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे गट आमनेसामने राहिला आहे.
आ. महेश शिंदे पुण्यात हाॅस्पीटलमध्ये?
आ. महेश शिंदे यांच्यासोबत हॅलो महाराष्ट्रचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता. त्याचे पीए यांनी महेश शिंदे हे पुण्यात एका हाॅस्पीटलमध्ये सांगितले. आ. महेश शिंदे यांच्या मुलाचा अपघात झाला असून आ. शिंदे हे काल रात्रीपासून पुण्यात असल्याचे पीएने म्हटले आहे. मात्र हाॅस्पीटलचे नाव सांगण्यास नकार दिला. त्यानंतर अधिक माहिती विचारता फोन कट करत दुसरीकडे ट्रान्सफर केला. त्यामुळे नक्की आ. महेश शिंदे हे पुण्यात की गुजरातमध्ये याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.