राजकीय प्रतिनिधी
प्रकाश आंबेडकरांना युती करायची नव्हती त्यामुळे त्यांनी दिवसेंदिवस जागासाठी आकडे वाढवले. भाजपने आंबेडकरांना भरपूर पैसे दिले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले.
ते म्हणाले मी माझ्या सहकाऱ्यांना आधीपासूनच सांगत होतो की आंबेडकर हे भाजप ला विकले गेले आहेत फक्त आम्ही उघडपणे बोलत नव्हतो. पण येत्या काही दिवसांत आम्ही आंबेडकरांना उघडे पाडू भाजपचे प्रतिनिधी असल्याचं सिद्ध करू. दलित जनतेला त्यांच्या बद्दल सहानुभूती असू शकते परंतु हे सत्य आहे की आंबेडकर भाजपचे प्रतिनिधी आहेत असा दावा चव्हाण यांनी केला.
तसेच मायावतींचे अस्तित्व संपवून आंबेडकरांना राष्ट्रीय नेता म्हणवुन घायचे आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचीत आघाडी स्थापन करून ओवेसींच्या एमआयएम ला सोबत घेतलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचा एकमेकांवर आरोप प्ररत्यारोपाचा पाऊस पडत आहे. चव्हाण यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.