सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री नितीश कुमार, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्या निर्णयानंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘या निर्णयामुळे बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आता मला विश्वास आहे की सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.’

मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, ‘आमच्या सरकारने जे काम केले ते कायदेशीर होते, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी कारवाई केली गेली. आता मला विश्वास आहे की सीबीआय कसून चौकशी करुन न्याय देईल. न्यायाची आशा फक्त कुटूंब किंवा बिहारलाच नाही तर संपूर्ण देशातील लोकांना आहे.’

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment