काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला भारतीय संविधानाची एक प्रत पाठवली असून लवकरच तुम्हाला मिळेल. देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा.’ काँग्रेसनं आपल्या ट्विटरवर मोदींना संविधानाची प्रत पाठवल्याचा अॅमेझॉनवरील स्नॅपशॉट पोस्ट केला आहे.

यासोबत आणखीही ट्विट्स काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत. कलम १४ चा स्पष्ट उल्लेख करत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सरकार भेदभावाचं पाऊल उचलू शकत नाही असं काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

आजपासून सामना बंद म्हणजे बंद; मनसेची आक्रमक मोहीम

पाकिस्तानी गायक अदनाम सामीच्या पद्मश्रीला मनसेचा विरोध; पुरस्कार रद्द करण्याची मागणी