जळगाव प्रतिनिधी |जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसते आहे. उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे नेते कैलास सूर्यवंशी यांनीच उन्मेष पाटील यांच्या वडिलांच्या विरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कैलास सूर्यवंशी यांनी दाखल केलेला गुन्हा नेमका कोणत्या स्वरूपाच्या धमकीचा आहे. हे अद्याप समजू शकले नाही मात्र भाजपमध्ये अंतर्गत सुरु असलेल्या धूसफुसीतूच हा गुन्हा दाखल केला गेला गेला असल्याचे समजते. मतदानाला अवघे काही तासचबाकी असताना अशा स्वरूपाचे भाजपच्या अंतर्गत खदखदणारेवाद समोर आल्याने भाजपच्या हातून जळगाव जाते कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
स्मिता वाघ यांना प्रथम उमेदवारी देत भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज देखील भरायला लावला. मात्र त्यांना त्या नंतर आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली. कारण पक्षाने उन्मेष पाटील यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे पुढे चालून हे वाढ निर्माण होणारच याची चुणूक या उमेदवार बदलीच्या कार्यक्रमाने दाखवून दिली होती.