पंतप्रधान निवासस्थानाचा पत्ता बदलणार; संसदेत पोहचण्यासाठी घरापासूनच बांधण्यात येणार नवीन भुयारी मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान निवास आणि संसद भवन यांना जोडण्यासाठी नवीन भुयारी मार्ग काढण्याचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत पंतप्रधान निवास साऊथ ब्लॉकला हलवण्यात येणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे संचालक विमल पटेल यांनी सांगितलं आहे. सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून हे काम … Read more

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपनीला धनंजय मुंडेंचा दणका; बजाज अलियांजवर गुन्हा दाखल

बीड, प्रतिनिधी, नीतीन चव्हाण :  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला न जुमाननाऱ्या बजाज कंपनीला जोरदार दणका बसला असून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अयोध्यात भव्य राम मंदिरासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापना करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे. त्यानुसार राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मोदींनी … Read more

मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस; CAA वर मागितले उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने मंगळवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सीएए) उत्तर मागण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. केरळ सरकारच्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. याचिकेनुसार सीएएने घटनेतील कलम 14, 21 आणि 25 चे उल्लंघन केले आहे. तसेच ते घटनेच्या मूलभूत भावना म्हणजेच समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातही आहे. याशिवाय पासपोर्ट दुरुस्ती नियम 2015 आणि … Read more

4 फेब्रुवारी 1670 : ‘गड आला पण सिंह गेला’, कोंढाणा जिंकण्याचा रोमांचक इतिहास, वाचा सिंहगडाचा इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री. म्हणजे, अगदी 350 वर्षांपूर्वी 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री पुण्यातील सिंहगड (तत्कालीन कोंढाणा) किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि मुघल सम्राट औरंगजेबचा किल्लेदार उदय भान राठोड यांच्यात युद्ध झाले. पुणे शहरापासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला 2000 … Read more

Delhi Opinion Poll: दिल्लीवर पुन्हा ‘आप’ची सत्ता तर भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा पुढच्या ३ दिवसात थंड होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात जोर लावला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होतांना दिसत आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी … Read more

नरेंद्र मोदी आता ताजमहल देखील विकतील – राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या प्रचाराच्या मैदानात आहेत. राहुल गांधींनी दिल्लीतील एका सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. Congress leader Rahul Gandhi: Narendra Modi coined good slogan of Make in India but not a … Read more

सरकारी योजनांना ‘शटडाउन इंडिया’, ‘शट-अप इंडिया’ अशी नावे द्या; शशी थरूरांचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदी सरकारला चिमटे काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या निमित्त शशी थरूर बोलत होते. शशी थरूर म्हणाले, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाला लिप सर्व्हिस देण्यात आली पण स्टँड अप इंडियाचा उल्लेख नाही कारण तुम्ही स्टँड-अप कॉमेडियन्सवर बंदी घालण्यात … Read more

NRC च्या भीतीने आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू; ममता बॅनर्जींचा धक्कादायक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : NRCच्या (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) भीतीमुळे आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने यांनी केला आहे. नादिया जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत, असंही त्या म्हणाल्या. West Bengal … Read more

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.