भगवा झेंडा खाली ठेवला नाही, आमचं अंतरंगही भगवंच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं भाजपाला प्रतिउत्तर

शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जेष्ठ शिवसैनीकांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

राज ठाकरेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सर्वांच्या नजरा

शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

२३ जानेवारी २०२० बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती. याच दिवशी महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी करत माध्यमांची फुटेज सकाळपासूनच खायला सुरुवात केली होती. एक होते अपघाताने राज्याचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नरंजन करत धुव्वाधार भाषणं देणारे राज ठाकरे. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलणे, महाअधिवेशन घेणे, अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवणे आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपली काय भूमिका आहे ते मांडणे हे सांगण्यासाठी मजबूत खटाटोप केला.

राज ठाकरेंचा CAA ला पाठींबा; CAA, NRC समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशभरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात दिली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठींबा द्यायला तयार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोदी सरकारला पाठींबा दिला. … Read more

मनसेनं झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

मनसेच्या महाअधिवेशनातं राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी बांधवानो अशी सुरवात करणाऱ्या ठाकरे यांनी या भाषणाची सुरवात माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. झेंडा आवडला का असा सवाल करून सभेला सुरवात केली. यावेळी नवीन त्यांनी नवीन झेंड्याबाबत आपले विचार मांडले.

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

पक्षांच्या अधिवेशनांची परंपरा कमी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिवेशन घ्यायची गरज वाटत होती असं म्हणत राज ठाकरेंनी २३ तारखेला घेतलेल्या अधिवेशनाविषयी स्पष्टता दिली. सोशल मीडिया वापरताना कोणतीही वाईट गोष्ट पदाधिकाऱ्यांनी पोस्ट करायची नाही अशी स्पष्ट तंबी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली. तुमच्या भावना महत्वाच्या असल्या तरी पद नावाच्या गोष्टीचा विचार व्हायलाच हवा असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान !! न्याय मिळावा म्हणून कोर्टात जाणार; बाबाजानी दुर्रानी यांचं मोठं वक्तव्य

आमचे पुरावे व बाजू ऐकून घ्या असं सांगण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आमची बाजू ऐकण्यासाठी वेळ व आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कृती समितीने याविषयी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काही मिनिटात एका मेसेजवर बुक करा विमानाचे तिकीट; व्हॉट्सअ‍ॅपवरून करा बुकिंग, जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फ्लाइट तिकिटांचे आरक्षण आता खूप सोप्पे झाले आहे. एका मेसेजवर आता बुकिंग होईल. आपल्याला फ्लाइट तिकीट बुकिंग करण्यासाठी कोणत्याही वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरून आपण फ्लाइट तिकिट बुक करू शकतो. वास्तविक, इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड (ईजॅमीट्रिप) ने फ्लाइट तिकिटांच्या बुकिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरवर एकत्रिकरणाची घोषणा केली आहे. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरुन ग्राहक … Read more

झेंडा बदलण्यापेक्षा मन बदला; रामदास आठवलेंचा मनसेला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही, मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. रामदास आठवले नगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला … Read more

सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ‘कॅबिनेट समन्वय समिती’ची स्थापना; प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकारने कॅबिनेट समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांचा समावेश या समितीत असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश असणार … Read more