जन्मस्थळाचा वाद साईबाबांनाच आवडणार नाही – छगन भुजबळ

शिर्डी : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटला आहे. विरोधक देखील या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेऊन या वादावर तोडगा काढणार आहेत. तत्पूर्वी या सरकारमधील जबाबदार मंत्री छगन भुजबळ यांनी या वादासंदर्भात भाष्य केले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरु असलेला वाद साईबाबांनाच आवडणार नाही. त्यामुळे … Read more

महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ

टीम हॅलो महाराष्ट्र : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी निदर्शनेही केली जात आहेत. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करताना एका आंदोलनकर्त्याने उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस खेचले.प्रशासन आंदोलकांना रोखण्यासाठी आणि आंदोलकांना रस्त्याच्या मधोमधुन हटविण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी भाजप नेत्याला कानशिलात लगावली. त्यानंतर एका … Read more

सोशल मीडियावर #SaiBirthPlacePathri ट्रेंड; साईबाबांचा जन्म पाथरीचाच !

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी शहराला साई जन्मभूमी म्हणून शंभर कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली अन् शिर्डी व पाथरी या दोन साई संस्थानांमधील वाद चांगलाच चिघळला. शिर्डीवासीय पाथरीला साई जन्मस्थान मानायला तयार नाहीत आणि इकडे पाथरीकर मात्र आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे बोलत आहेत. या … Read more

समाजातील शोषित घटकांना उभं करण्यासाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज – शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी सत्तेचा वापर करून रयतेसाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. … Read more

CAA ला विरोध करणारे दलित विरोधी – अमित शहा

हुबळी : जे CAA च्या विरोधात आहेत ते दलित विरोधी आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. CAA च्या समर्थनार्थ अमित शहा कर्नाटकातील हुबळी येथे बोलत होते. त्यावेळेस बोलताना त्यांनी काँग्रेसवर तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हंटले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणार्‍यांना मला विचारायचे आहे की पाकिस्तान, … Read more

राहुल गांधींनंतरच्या दहा पिढ्यासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करू शकत नाही- स्मृती इराणी

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ”’मी माफी मागणार नाही, कारण मी राहुल सावरकर नाही असं मागे एकदा राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळं मला आज त्यांना सांगायचं आहे की तुमच्यानंतरच्या दहा पिढ्यांनासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करता येणार नाही.” असा घणाघात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्या – प्रकाश आंबेडकर

पुणे : इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध आहे, त्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो निधी आंबेडकर पुतळ्यासाठी किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दिला असेल तो निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काढावा, अशी माझी विनंती आहे. … Read more

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला; चंद्रकांत पाटील यांनी घेतला मेगाभरती विधानावरून यु-टर्न

”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” असं जाहीर विधान काल चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

संजय राऊत यांनी राहुल गांधींना उत्तर देण्याचं जे धाडस दाखवलं त्याच कौतुकच आहे..

काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? आदित्य ठाकरेंनी लगावला संजय राऊतांना टोला

सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असं आदित्य ठाकरे यांनी आता स्पष्टीकरण दिल आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावत इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असं म्हटलं आहे.