कर्नाटकमधील गरीब मद्यपींसाठी आनंदाची बातमी, ब्रँडेड दारूवर मिळणार सरकारी अनुदान

गरीब लोक कमी दर्जाची दारू पिण्यापासून रोखण्यासाठी काही दारूच्या ब्रँडवर अनुदान देण्याचा विचार कर्नाटकच्या उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलत आहे. याशिवाय सरकारकडून राज्यात बार आणि रेस्टॉरंट रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. काँग्रेस-जेडीएस आघाडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलेले अपक्ष आमदार एच नागेश यांच्याकडे महत्वाचे खाते मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिलं आहे. ते हा निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे.

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

नव्या लढ्यासाठी मी सज्ज, आता एक इंचभरही मागे हटणार नाही – आयशे घोष

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..!! आता मी सुरक्षित असून परत आले आहे. नवीन लढ्यासाठी पुन्हा सज्ज होऊन..!! या लढ्यात आता एक इंचभरही मागे हटणार असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशे घोष हिने व्यक्त केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर असून येत्या ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता आहे.

जेएनयूचा हल्ला पाहून मला २६/११ ची आठवण झाली – उद्धव ठाकरे

जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

जेएनयूवरील हल्ला वेदनादायी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांची खंत

जेएनयूमधील अनेक विद्यार्थ्यांवर शनिवारी सायंकाळी काही गुंडांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं. देशभरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असून समाजकारण, राजकारण यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींकडून निषेधाच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी झालेला प्रकार वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

भारतीयांनी आता गुंडगिरी खपवून घेऊ नये – आनंद महिंद्रा

बुद्धीमंतांचा गढ समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना क्रूर पद्धतीने मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. फी वाढ, नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर वातावरण तापलेलं असताना आधी जामिया मिलिया आणि आता जेएनयूमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

जेएनयू हल्ल्याची चौकशी करण्याची अमित शहा यांची मागणी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं आहे. चेहरे बांधलेल्या अवस्थेत गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.